लाभार्थी मात्र एकही नाही, चारही ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्हचे, रूग्णांनी प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी पुढे यावे
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हा शासकीय रूग्णालयात प्लाझ्मा थेरपी सेंटरचे 25 लाखांचे युनिट बसवण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसात या ठिकाणी 4 कोरोनामुक्त झालेल्या व अॅन्टीबॉडी रिपोर्ट पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांनी प्लाझ्मा डोनेट केले आहे. मात्र हे चौघाजणांचे ब्लड ग्रुप हे ए पॉझिटीव्ह ग्रुपचे आहेत. त्यामुळे हे प्लाझ्मा केवळ ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असलेल्या कोरोना रूग्णाला चालणार आहे. त्यामुळे 3 दिवसात एकाही रूग्णाला या ग्रुपच्या प्लाझ्माची आवश्यकता भासली नाही. इतर ब्लड गुपचे तेही अॅन्टीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास प्लाझ्मा डोनेट करावे, असे आवाहन जिल्हा शासकीय रूग्णालयाने केले आहे.
शासकीय रूग्णालयातील एका बी पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या कोरोना रूग्णाला प्लाझ्माची आवश्यकता असल्याने प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी आवाहन केले होते. त्यानंतर या ठिकाणी 7 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले, मात्र यामधील चारच रूग्णांमध्ये अॅन्टीबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या चार रूग्णांचे प्लाझ्मा घेण्यात आले. या चार जणांचे ब्लड ग्रुप हे योगायोगाने ए पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपच्या कोरोना रूग्णालाच हे प्लाझ्मा देता येणार असल्याचे सिव्हील हॉस्पीटलच्या प्लाझ्मा सेंटरकडून सांगण्यात आले.









