प्रतिनिधी/रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे जल तरण तलावाजवळ तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या चप्पल दुकानाला अचानक आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवली असली तरी या आगीत दुकानातील माल जळाल्याने मोठे नुकसान झाले. काल, शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
काही दिवसांपूर्वीच साळवी स्टॉप येथील रस्त्याच्या बाजूलाअसलेल्या जागेततात्पुरत्या स्वरुपात चप्पलचे दुकान टाकण्यात होते बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचे हे दुकान होते. शनिवारी रात्री या दुकानाला बाहेरून लावलेल्या कापडाने पेट घेतला आणि दुकानाला आग लागली. आगीचे लोळ उठल्याने एकच गडबड उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रनपच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. मात्र या आगीत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.
Previous Articleविराटची पहिली ऑडी पोलीस स्टेशनमध्ये का?
Next Article कर्नाटकात कोरोनाचा वेग कमी होतोय









