प्रतिनिधी /खेड
स्वस्त किंमतीत सोने देण्याच्या आमिषाने चौघांना चाकूचा धाक दाखवत ६० लाखाची रोकड लुटणाऱ्या टोळीतील रोशन तुरे ( २५, रा. दापोली ) या फरारीस येथील पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. लूटप्रकरणातील मुख्य सूत्रधारासह अन्य तीघेजण अजूनही फरारीच असून पोलिसांची पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत.
अमर दिलीप जड्याळ याने ६० लाखाची फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला देत अवघ्या काही तासातच दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलमय भागात टोळीतील ५ जणांना व अन्य एकास मंडणगड येथून येथील पोलिसांनी अटक करत दोन लाखाच्या रोकडसह पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मुख्य सूत्रधार किशोर पवारसह चार फरारीच्या शोधार्थ पोलीस पथकांचा मुंबईतील तळ अजूनही कायमच आहे. पोलीस पथके मुख्य सूत्रधारासह फरारीच्या शोधार्थ जंगजंग पछाडत असताना टोळीतील फरारी रोशन तुरे दापोली येथील घरी आल्याची कुणकुण पोलिसांना लागताच येथील पोलिसांनी त्याला घरातूनच जेरबंद केले. आतापर्यंत अटकेतील दरोडेखोरांची संख्या ९वर पोहचली आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके फरारींचा कसून शोध घेत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









