खेड पोलीस पथकाची कारवाई, लूटप्रकरणाचा होणार उलगडा, खेड पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध जारीच
प्रतिनिधी / खेड
दोन किलो सोने खरेदीच्या व्यवहारातील सोने न देताच चौघांना चाकूचा धाक दाखवत ६० लाखांची रोकड लुटल्याप्रकरणी येथील पोलिसांच्या पथकाने आणखी ५ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पथकाने रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील जंगलमय भागातून ५ जणांना शिताफीने ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याकडून काही रोकडसह ५ मोबाईल व एक दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे समजते. मुख्य सूत्रधार मात्र अजूनही फरारच असून पोलीस पथकांकडून शोध जारी आहे.
सोन्याचे दागिने कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवत दोन किलो सोने खरेदीच्या व्यवहारासाठी गेलेल्या चौघांना चाकूचा धाक दाखवत साठ लाखाची रोकड लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीतील येथील पोलिसांनी विक्रांत विश्वनाथ चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार या दोघांना येथील पोलिसांनी गजाआड केले आहे. दापोली तालुक्यातील हर्णे येथील रहिवाशी असलेला टोळीतील मुख्य सूत्रधार किशोर पवार अजूनही फरारीच आहे. मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथकानेही सापळा रचला असून लवकरच त्यास जेरबंद करू, असा विश्वास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, टोळीतील फरारीच्या शोधार्थ येथील तीन पोलीस पथके ठिकठिकाणी रवाना झाली होती.
गेल्या तीन दिवसापासून मुंबई येथेही पोलीस पथक तळ ठोकून होते. याशिवाय रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथेही पोलीस पथकाने फरारींच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा रचला होता. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या नेतृत्वाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व अन्य सहकाऱ्यांनी ५ संशयितांना तेथील पोलिसांच्या मदतीने म्हसळा येथील जंगलमय भागातून ताब्यात घेतल्याचे समजते.
या संशयितांकडून काही रोकडसह ५ मोबाईल व एक दुचाकी हस्तगत केल्याची माहितीही पुढे आली आहे. ६० लाखाच्या लूटप्रकरणातील फरारी असलेल्या ५ जणांना पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच ते म्हसळा येथील जंगलमय भागात लपून बसले होते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमुळे लवकरच लूटप्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असून मुख्य सूत्रधारही पोलिसांच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. पोलीस पथकांकडून मुख्य सूत्रधाराचा गेल्या चार दिवसापासून कसून शोधा सुरू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









