प्रतिनिधी/रत्नागिरी
ग्रामविकास विभागाच्या 06 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेनुसार जिह्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 3 (अ) (ब) व 4 प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी तालुकानिहाय सरपंचाची पदे वेगवेगळया प्रवर्गासाठी आणि महिलासाठी पुढील (सन 2020 ते 2025 या कालावधीत गठीत होणाऱया ग्रामपंचायत) पाच वर्षासाठी आरक्षित करुन सरपंच पदाची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील 9 तालुक्यातील 846 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्हयात कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 182 (4) नुसार सरपंच पदाचे आरक्षण प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन रत्नागिरी जिल्हयातील सर्व तालुक्याचे तहसीलदार यांना सरपंच पदाचे आरक्षण नेमून दिलेल्या सरपंचाची आणि महिला सरपंचाची पदे आरक्षित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार व या अनुषंगाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण करावे. सरपंच पदाचे आरक्षण सोडत 15 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाणी होणार आहे. यावेळी शासनाने कोव्हिड-19 बाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात यावे तसेच कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सभेच्या ठिकाणी खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. सभा मोठया हॉल मध्ये घेण्यात यावी व सभेच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवुन बैठकीची व्यवस्था करावी. सभेच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील. सभेच्या ठिकाणी ध्वनीप्रक्षेपकाची व्यवस्था करावी. सभेच्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. सभेच्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे तापमान मोजणेसाठी पुरेशी व्यवस्था ठेवणेत यावी. सभेच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणेबाबत आपण स्वत: योग्य ती दक्षता घ्यावी. सभेचे ठिकाण निर्जंतुकीकरण करण्यात यावे. सभेचा परिसर स्वच्छ ठेवणे. सतत हातळल्या जाणाया वस्तू जसे दरवाज्याचे हॅन्डल्स, टेबल, खुर्ची, जिन्यावरील रेलींग इत्यादींची वारंवार स्वच्छता ठेवणेत यावी. सभेच्या ठिकाणी गर्दीचे नियंत्रण करावे. एकाचवेळी जास्त लोक जमणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व मदत व पुर्नवसन यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्याविषयी सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबी विचारात घेऊन सरपंच आरक्षण कार्यक्रमाबाबत कार्यवाही करावी, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रत्नागिरी यांनी कळविले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









