प्रतिनिधी /संगमेश्वर
सबारी कंपनीच्या दगड उत्खनन करण्याच्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील खाणीमुळे आंबव भुवडवाडीतील मार्च पर्यंत डोंगरातील झऱ्यातून मिळणारे पाणी यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच गायब झाले आहे. त्यामुळे त्या झऱ्यावरची नळपाणी योजना देखील बंद पडली आहे. पकडेवाडीतील सहा तर, घडशीवाडीतील चार घरांना जोत्यापासून भिंतीपर्यंत तडे गेलेले आहेत. सुरुंग जेव्हा लावला जातो तेव्हा भूकंप झाला म्हणून लोक घराबाहेर पळतात, किचन मधील मांडणी वरील भांडी सुरुंगांच्या कंपनाने जमिनीवर पडतात. गेली दोन वर्षे हे चालू आहे, हे पुढे असेच चालू राहिल्यास आंबव ग्रामस्थांना घरी रहाणे च धोकादायक बनणार आहे. घरे देखील उध्वस्त होतील अशी भिती आहे . महिन्याभरापूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर आज बहुजन विकास आघाडी तर्फे अध्यक्ष सुरेश भायजे यांच्या नेत्तृत्वाखाली कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारण्यात आला . यावेळी महिलावर्गाने कंपनीची अक्षरशः बोलतीच बंद केली.
सकाळी साडेअकरा वाजता बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे यांच्या नेतृत्वाखाली सबारी ई. कंपनीवर मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी कृष्णा धुलप, कुणबी शाखा अध्यक्ष, राजाराम जुवळे, तंटामुक्त अध्यक्ष, शांताराम घडशी गावकर, विलास मांडवकर, शंकर सुवरे, राजाराम मायनक, विजय पकडे, नारायण बोले,अंनत पकडे, सुनील घडशी, मंगेश मांडवकर, सुरेश जुवळे, गणपत घडशी,चंद्रकांत जुवळे, बबन बोले, दत्ताराम घडशी, सौ, शकुंतला पकडे, सौ शीतल पकडे. हर्षाली पकडे,शर्मिला पकडे,दामिनी दिपक पकडे आदी महिला व आंबव ग्रामस्थ सहभागी होते. कंपनीचे मालक चंद्रकांत माने, मंडळ अधिकारी जाधव, पोलीस शिंदे व त्यांचे सहकारी यांना यावेळी सर्व वस्तूस्थिती सांगून निवेदनही देण्यात आले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









