प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वरजवळच्या निवळी येथे युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही.
सूर्यकांत सुनील पवार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सूर्यकांत याने राहत्या घरात शुक्रवारी सकाळी 7 वा दरम्यान मुख्य दरवाजा समोरील भिंती लगतच्या वाशाला कपडे सुकवायच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नसून संगमेश्वर पोलीस तपास करीत आहेत.









