प्रतिनिधी / दापोली
केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधक दापोलीमध्ये काँग्रेसच्यावतीने नुकतीच सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
यावेळी या कायद्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या व त्यावर सडकून टीका करण्यात आली. दापोलीत घेण्यात आलेल्या सह्या या प्रदेश काँग्रेस कडे पाठवण्यात येतील. यानंतर या सह्या राज्यसभेतील खासदार यांच्यामार्फत विधिमंडळात मांडण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दिवसभर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस संतोष शिर्के, तालुकाध्यक्ष अनंत उर्फ भाऊ मोहिते, सरचिटणीस अशोक जाधव, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अविनाश मोहिते, शहराध्यक्ष सिराज रखांगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य विठा कदम, जिल्हा युवक काँग्रेसची गणेश कणेरी, मीना रेडीज, जानकी बेलोसे यांच्यासह अनेक काँग्रेस प्रेमी उपस्थित होते. ही सह्यांची मोहीम 5 नोव्हेंबर पर्यंत सुरू रहाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.









