प्रतिनिधी / रत्नागिरी
नगराध्यक्ष, रस्त्यावरील खड्डे कधी भरणार ? असा प्रश्न उपस्थित करत रत्नागिरी शहर भाजपच्यावतीने आज आठवडा बाजार परिसर, गांधी कॉलनी येथील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. भाजपच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू होती. शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. भाजपने नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करत ‘रस्त्यावरील खड्डे भरा नाहीतर खुर्च्या खाली करा’, 8 दिवसांत सर्व रस्ते चकाचक करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे शहराध्यक्ष सचिन करमरकर यांनी दिला.
गेली काही वर्षे शहरातील रस्त्यांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. एकदा केलेल्या कामानंतर रस्त्यांवर पुन्हा डांबर टाकावे लागते, एकदा केलेला रस्ता किती वर्षे टिकला पाहिजे याबाबतही नियम, निकष आहेत.
परंतु सत्ताधार्यांकडून रस्त्यांच्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आता तरी नगराध्यक्षांनी यात लक्ष घालून रस्ते चकाचक करावेत. ज्यांनी नगराध्यक्ष व सत्ताधार्यांना निवडून दिले त्या जनतेची कामे करावीत, असा टोला भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांना लगावला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांना समस्यांबाबत पत्र पाठवले तरीही त्यांच्याकडून उत्तर दिले जात नाही, जनतेच्या रोषाला कारणीभूत होऊ नका, असा अशाही पटवर्धन यांनी दिला. केंद्र सरकारकडून रत्नागिरी नगरपालिकेला स्वच्छतेचे पारितोषिक मिळाले. परंतु शहरातील समस्या कायम आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर भाजपच्या वतीने आज सकाळी आठवडा बाजार येथील गांधी कॉलनीच्या रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर माळनाका येथील खराब झालेल्या रस्त्यावर सत्ताधार्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी विनय उर्फ भैया मलुष्टे, संदीप सुर्वे, नगरसेवक राजेश तोडणकर आदी उपस्थित होते.
रत्नागिरी शहराच्या अनेक प्रभागांमध्ये अस्वच्छता दिसते. तसेच ठरावीक प्रभागातच कामे केली जातात. शहरातील बहुतांशी रस्ते खड्डेमय, गाडी चालवण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्यामुळे त्वरित खड्डे भरून डांबरीकरण करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने या वेळी करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









