प्रतिनिधी / दापोली
निसर्ग चक्रीवादळानंतर दापोली व मंडणगड मधील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आलेली आहेत ही वीज बिले तात्काळ दुरुस्त करून मिळावी व नागरिकांना पाच टप्प्यांमध्ये वीज बिल भरायला मुभा मिळावी अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली शिवाय वाढीव आलेली बिले भरण्यास नागरिकांना उशीर झाला तरी कोणत्याही नागरिकाचे ग्रामस्थांचे वीज जोडणी कापू नये असा सज्जड दम आ. योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर दापोली व मंडणगड मधील वीज ग्राहकांना सरासरीने अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आली या बिलाचा आकडा एवढा मोठा आहे, की ते वीज बिल भरणे ग्रामस्थांना शक्य नाही या सर्वांनी आ. योगेश कदम यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यावर आ. कदम यांनी दापोली नगरपंचायतमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली या महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत ‘जर कोणाचे वीज कनेक्शन खंडित केले तर गाठ माझ्याशी आहे’ असा दम योगेश कदम यांनी असा सज्जड दम आ. योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला शिवाय ही बिले तत्काळ दुरुस्त करून देण्यात यावी व वाढीव आलेले बिल वजा करून मिळावे शिवाय ही बिले भरण्याकरिता जो नागरिक मागणी करेल त्याला पाच टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा देण्यात यावी असा आदेश योगेश कदम यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
याच बैठकीमध्ये भारत दूरसंचार निगम लि. च्या अधिकाऱ्यांची देखील योगेश कदम यांनी चांगली हजेरी घेतली 3 जून रोजी चक्रीवादळ होऊन देखील आज अनेक गावांमध्ये मोबाईलची रिंग वाजत नाहीये यावरून संतप्त झालेल्या आ. योगेश कदम यांनी दापोली तालुक्यातील सर्व गावांमध्ये तात्काळ मोबाईलची रिंग वाचायला पाहिजे असा आदेश अधिकाऱ्यांना दिला शिवाय जिथे 2 जी व 3 जी ची रेंज मिळते 4 जी ची रेंज मिळावी, जेणे करून विद्यार्थ्यांना घरी राहून अभ्यास करता येईल अशी मागणी देखील योगेश कदम यांनी यावेळी बोलताना केली
तसेच जिओ कंपनीचे टॉवर्स ज्या भागात उभे करण्यात आले आहेत. परंतु जे टॉवर कंपनीच्या नियमात बंद आहे ते टॉवर तात्काळ सुरु करण्यात यावेत असे देखील कदम यांनी जिओ कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुनावले तसेच ज्या गावांमध्ये अद्याप पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा सुरू झालेला नाही या गावांकडे विशेष लक्ष देऊन महावितरणने तेथे वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने कसा सुरू होईल, याकडे तात्काळ लक्ष देऊन आपल्याला त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश देखील आ. योगेश कदम यांनी यावेळी बोलताना दिले.
या बैठकीला महावितरण, भारत संचार निगम लिमिटेड, जिओ कंपनी कंपन्यांचे अधिकारी लोकप्रतिनिधी नगराध्यक्ष परवीन शेख, तहसीलदार वैशाली पाटील, यांच्यासह अनेक पदाधिकारी व सरकारी अधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









