प्रतिनिधी / लांजा
दोन दिवस दाट धुके पडले असतानाच गुरुवारी पहाटे पावसाच्या रिमझिम सारी पडल्या तर दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार गारा व ढगांच्या गडगडाटीसह अवकाळी पाऊस पडला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार यांची चिंता वाढीस लागली आहे.









