प्रतिनिधी / लांजा
केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात लांजा तालुका शिवसेना व युवासेना यांच्यावतीने आज शुक्रवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर लांजा बस स्थानका समोर चूल पेटवून केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
लांजा बस स्थानक ते लांजा तहसील कार्यालय अशी निषेध घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. त्यांनतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लांजा तालुका शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.