प्रतिनिधी/लांजा
काल, रविवारी सायंकाळ पासून वादळी पावसाची संततधार सुरु असल्याने मुंबई गोवा महामार्गाने लांजा शहरात नदीचे स्वरूप प्राप्त केले आहे. लांजा बाजारपेठत व शहरातील अंतर्गत रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. शहरात महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने महामार्गाने नदीचे रुप धारण केले आहे.
गेली दोन दिवस तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस सुरु आहे. यामुळे लांजा शहरात महामार्गावरील गटारे पाण्याने तुडुंब भरली आहेत. गटारामधील पाणी रस्त्यावर येत असल्याने गटारे दिसेनाशी झाले आहेत. यातच रस्त्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी गाडी गटारामध्ये जाऊन कलंडल्याची घटना घडली आज, सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
Previous Articleसांगली जिल्ह्याला दिलासा, कोरोनामुक्त १७९३
Next Article ‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली









