कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपासह शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचे समर्थन
वार्ताहर / राजापूर
राजापूरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ राजापूर नगर परिषदेने मंगळवारी आयोजीत सभेत ठराव केला. नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. या ठरावाला कॉंग्रेसच्या ६, राष्ट्रवादी १, भाजप १ आणि शिवसेनेच्या २ नगरसेवकांनी ठरावाला समर्थन दिले.
रिफायनरी प्रकल्प राजापूरात झाला तर चांगली विकासाची कामे होतील. आरोग्याच्या सुविधा प्राप्त होतील. चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील. रोजगार निर्मिती होईल. याचा विचार करुन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात झाला पाहिजे. असा ठराव राजापूर नगर परिषदेत आज संमत झाला.









