वार्ताहर / राजापूर
रिफायनरी प्रकल्प राजापूरातच व्हावा, असा ठराव नगरप्ररिषदेत करावा अशा मागणीचे प्रत्र राजापुरातील वकील संघटना व राजापूर तालुका व्यापारी संघाच्यावतीने देण्यात आले आहे. सुमारे तीन लाख कोटी रूपयांच्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेतून मोठे समर्थन मिळत असतानाच आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाबाबत सकारात्मक वक्तव्य केल्याने समर्थकांना चांगलेच बळ मिळाले आहे.
आ.साळवींनी प्रकल्पाला समर्थन मिळाल्यास शासन सकारात्मक विचार करेल असे स्पष्ट केल्याने रिफायनरी प्रकल्पाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहे. रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, जमिनदार, बागायतदार यांच्यासोबतच राजापूरातील विविध सामाजिक, व्यावसायिक तसेच अन्य संघटनांचा मोठा पाठिंबा आहे. राजापूर तालुका व्यापारी संघ तसेच वकील संघटनांनी यापूर्वीच प्रकल्पाला पाठींबा दिला आहे.









