वार्ताहर /राजापूर
राजापूर शहर बाजारपेठेतील एक बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखों रूपये किंमतीचे दागिने आणि काही रोकड लंपास केली आहे. बुधवारी सकाळी ही चोरी उघडकीला आली. शहरात गजबजलेल्या वस्तीत हा धाडसी दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास राजापूर शहर बाजारपेठेतील पै.अकबर ठाकूर यांच्या बंद घराचा मागचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून तळमजला व वरच्या मजल्यावरील दोन कपाटे फोडून सुमारे दहा तोळ्यापेक्षा अधिक सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सहकारऱयांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर तात्काळ श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.









