प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील संशयित कोरोना रुग्णांकरिता शहरात उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरमधील गैरसोईनबाबत बाबत धडक देऊन युवा सेनेच्या वतीने त्यांचा पर्दाफाश करण्यात आला.
दापोली शहरातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील किसान भवन नजीक असणाऱ्या शेतकरी भवन येथे कोरोना रुग्णांकरिता अलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे या केंद्रात गैरसोय असल्याच्या तक्रारी युवा सेनेकडे प्राप्त झाल्या यानंतर दापोली शहर युवा सेना अधिकारी मयूर पारकर, नगराध्यक्षा परवीन शेख, नगरसेवक केदार परांजपे व युवा सैनिकांनी यांनी रविवारी प्रत्यक्ष कोरोना सेंटरमध्ये जाऊन पाहणी केली यावेळी त्यांना तेथे स्वॅब घेण्यासाठी दिवसभरात कोणीही आलेले नसल्याचे निदर्शनात आले शिवाय तेथील दाखल असणाऱ्या रुग्णांना दिवसातून दोन वेळा गरम पाणी पिण्यास देणे आवश्यक असतानाही गरम पाणी देत नसल्याचे आढळून आले त्याचप्रमाणे कोरोना संशयित रुग्णांना आंघोळीसाठीसाठी देखील गरम पाणी प्रशासनाकडून उपलब्ध होत नसल्याचे त्यांच्या पाहणीत आढळून आले.
कोरोना झालेल्या रुग्णांची दोन दिवसात तपासणी देखील करण्यात न आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले याबाबत त्यांनी तेथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला यावर हिटर बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले शिवाय येथे अस्वच्छता देखील या पथकाला आढळून आली यानंतर त्यांनी दापोलीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पितळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. यानंतर नगरसेवक केदार परांजपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे दूरध्वनीद्वारे संपर्क साधला यावेळी येथे हे तात्काळ सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तोंडी आश्वासन देण्यात आले, मात्र याबाबत आता आवाज उठवणार असल्याचे व सोमवारी प्रशासनाला याबाबत निवेदन देणार असल्याचे नगरसेवक केदार परांजपे यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








