प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील मोरवंडे – मोदगेवाडी येथील अंगणवाडीत होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या ६० वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनंत भुवड असे मृत वृद्धाचे नाव आहे.
या वृद्धास २२ मे रोजी नजीकच्या अंगणवाडीत होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्याच्या स्वबचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठवले असता अहवालही निगेटिव्ह आला होता. मात्र, तरीही वृद्धाने आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.









