प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केले अनोखे आंदोलन
प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्हाभरात पडणारा मुसळधार पाउस आणि भरतीच्या वेळी समुद्राला आलेले उधाण यामुळे मिऱया संरक्षक बंधाऱयाची मोठी वाताहात उडाली आहे. आजवर अनेक आंदोलने करूनही तेथील परिस्थितीकडे पशासनाने केलेले दुर्लक्ष लक्षात घेत उद्ध्वस्त झालेल्या बंधाऱयावर श्रीराम लिहिलेला दगड ठेवून भगवा फडकवण्यात आला.
मिऱया धूपपतिबंधक बंधाऱयाला पुन्हा एकदा भगदाड पडले आहे. समुद्राचे खवळलेले पाणी किनारपट्टी भागात शिरल्याने तेथील घरे व बगयातीला धोका निर्माण झाला आहे. आजवर अनेक आंदोलने करूनही प्रशासन इकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. या परिस्थितीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आता विविध पद्धतीने मिऱया ग्रामस्थ आंदोलने करीत आहेत. काही दिवसांपूर्वी संदीप शिरधनकर या तरुणाने बंधाऱयावर जाऊन निषेध म्हणून स्वतचे मुंडण करून घेतले होते. पण बंधाऱयाची स्थिती दिवसेंदिवस उधाणाने गंभीर बनत चालली आहे.
त्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी संदीप शिरधनकर या तरुणाने जय श्रीराम लिहिलेला दगड बंधाऱयावर ठेऊन भगवा झेंडा फडकवला. यावेळी आप्पा वांदरकर, चिराग सावंत, बाबा शिवलकर, नागेश शेट्ये, गोट्या कीर, ययाती शिवलकर, उदय पाटील, रोशन मयेकर, साहिल मयेकर, शिवं बोरकर, बंड्या मयेकर, ओमकार पाटील, रोहन बनप, तुषार पाटील आदी उपस्थित होते.









