प्रतिनिधी / संगमेश्वर
लहरी हवामानामुळे बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना माभळे गावात 5 एकर जागेत लागलेल्या वणव्यामुळे आंबा काजूच्या कलमांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्यावर्षी लागलेल्या वनव्यामुळे 3 एकर क्षेत्रातील बागा जळून खाक झाला होता. यावर्षीही तसाच प्रकार झाला असून अचानक लागलेल्या वनव्यामुळे 5 एकर क्षेत्रातील काजू आणि आंबे बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या वणव्यात बागा जळून खाक झाल्या आहेत त्यामुळे अंदाजे 5 ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करीत तीन बागा वणव्यापासून वाचविल्या.
Previous Article१७२२ शेतकरी महिलांनी भरले ३ कोटींचे वीजबिल
Next Article TMC ला धक्का; ऐन निवडणुकीत 5 आमदार भाजपात









