प्रतिनिधी / दापोली
घरगुती गॅसच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ व दररोज वाढत जाणारे डिझेल व पेट्रोलचे दर याच्या विरोधात दापोली शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी शिवसेना शाखेच्या समोर निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदार यांना निवेदन देखील सादर करण्यात आले
या निवेदनात म्हटले आहे की, देशातील जनता महागाईने त्रस्त असताना त्यांना दिलासा देण्याचे सोडून पेट्रोल- डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केली जात आहे. हे कमी म्हणून की काय घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात दोन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लूट थांबवून महागाईच्या वणव्यातून सामान्य माणसाला बाहेर काढावे, अशी आमची विनंती आहे. यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने दापोली तालुक्यात आज केंद्र सरकारच्या निषेधार्थ निषेध मोर्चा काढून आम्ही हे निवेदन देत आहोत असे देखील या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या आंदोलनाच्या वेळी दापोलीतील अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते









