प्रतिनिधी / रत्नागिरी
शहरातील बोर्डींग रोड परिसरामध्ये अवैध मटका चालकाविरुध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास बोर्डींग रोड परिसरामध्ये टीसीएम शाळेच्या बाजूला विल्सन सॅम्युवेल वाघचौरे (28 रा. टीसीएम शाळेच्या बाजूला, बोर्डींग रोड, रत्नागिरी) हा मटका जुगाराचा खेळ चालवत असल्याचे समोर आले. यावेळी त्याच्याकडून 420 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळाले. या पकरणी वाघचौरे विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल जयवंत बगड यांनी शहर पोलास ठाण्यात फिर्याद दिली. याबद्दलचा अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करत आहे.