प्रतिनिधी / संगमेश्वर
मंगला एक्स्प्रेसमधून आपल्या गावी निघालेल्या दोघी संगमेश्वर जवळच्या आंबेडखुर्द येथील बोगद्यात रेल्वे मधून पडल्याने जागीच मृत्यू झाला. सदरची घटना शुक्रवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या दरम्यान घडली.
ममता भजनलाल वय 41 आणि रमा भजनलाल वय 20 असे मृत्यू झालेल्या दोघींचे नावे आहेत. रत्नागिरीहुन सकाळच्या दरम्याने राजस्थान या मूळ गावी त्या निघाल्या होत्या. रेल्वेच्या दिव्यांग डब्यात त्या बसल्या होत्या मात्र गर्दी असल्याने तोल जावून त्या पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत तेजवीर भजनलाल कुमार यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.









