प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीचा बारा वाड्यांचा अधिपती श्री देव भैरीबुवाचा शिमगोत्सव सोमवारी साधेपणाने साजरा झाला. पालखीची मिरवणूक मर्यादित लोकांच्या उपस्थितीत रथातून काढण्यात आली. श्री देव भैरी सहाणेवर विराजमान होऊन रविवारी रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरी बुवाची पालखी बाहेर पडली. रथावर विराजमान होत भैरीबुवा सहाणेवर विराजमान झाले. गाडी जाणे शक्य नाही, तेथेच पाय वाटेने खांद्यावरून पालखी नेण्यात आली.
ठराविक अंतर ठेवून सुरक्षित पध्दतीने हुलपे घेण्यात आले. सडामिऱ्या, जाकीमिऱ्या, टेंभ्ये गावच्या पालख्यांनी पालखी भेटीची परंपरा खंडित होऊ न देता मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत परंपरा सांभाळली. यंदा होळीही उंचीने लहान ठेवण्यात आली होती व ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगाव सहाणेवर उभी करण्यात आली. पशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मंदिरांकडे जाणारे रस्ते दोन्ही बाजूंनी वाहनांसाठी बंद ठेवले होते.









