प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर न सांगता निघून गेलेले तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दापोली शहरातील काळकाईकोंड येथे सापडून आले आहेत. त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तपासणी करून तसे प्रमाणपत्र मिळवणे या तिघांना गरजेचे होते. टेस्ट मध्ये आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत कळल्यावर नवरा-बायको व त्यांच्या मुलाने कोणत्याही वैद्यकीय अधिकार्याला व तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांना न सांगता त्यांचा डोळा चुकवून तेथून मोटरसायकलने पळ काढला होता.
आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ दापोली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दापोली पोलिसांनी व आरोग्य विभागाने तात्काळ हालचाल करून या तिघांचाही शोध लावला. हे तिघे दापोली शहरातील काळकाई कोंड परिसरात सापडून आले. त्यांना ताब्यात घेऊन तात्काळ डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कोव्हीड कक्षात ठेवण्यात आले आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









