प्रतिनिधी / राजापूर
शिवीगाळ करणे ,त्रास देणे या कारणास्तव पतीने पत्नीचे नाक व तोंड दाबुन खून केल्याची घटना परुळे (राजापुर) येथे शुक्रवारी घडली. यातील मयत महिला ही ३५ वर्षीय आहे.
सिध्दी उर्फ विद्या गजानन भोवड असे तिचे नाव आहे. परुळे सुतारवाडी येथील ती रहिवाशी असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर तिचा पती गजानन जगन्नाथ भोवड ( ४०) याने बनाव करताना अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढत नेले व तिचा खुन केल्याचे भासवत पोलीसानाही गुंगारा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चाणाक्ष पोलीसांनी तो हाणून पाडला. अखेर पत्नीचा खुन आपणच केल्याची कबुलीपती गजानन बोल्ड याने दिली.









