चाकाळेतील स्थानिक तरूणांचे धाडस, दोन तासांचा थरार, भात लावणीसाठी गेले होते शेतकरी
प्रतिनिधी/खेड
काल, शनिवारी सायंकाळच्या सुमारास नारंगी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तालुक्यातील चाकाळे येथील ४० हून अधिक शेतकऱ्यांना स्थानिक तरूणांनी प्रसंगावधान राखत मानवी साखळीद्वारे सुखरूपरित्या बाहेर काढले. हा थरार तब्बल दोन तास सुरू होता. तरूणांच्या धाडसाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
शनिवारी दिवसभर धुवाँधार कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळच्या सुमारास जगबुडी व नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नारंगी नदी सभोवतालची भात शेती पुराच्या पाण्यात अडकली. तालुक्यातील चाकाळे येथील शेतकरी चाकाळे व चिंचघर दरम्यानच्या खलाटीत भात लावणीसाठी गेले होते. अचानक पावसाचा जोर वाढून भात शेती पाण्याखाली गेली. भात लावणीसाठी गेलेले चाकाळे येथील ४० हून अधिक शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले. सायंकाळी उशिरापर्यंत हे शेतकरी घरी न परतल्याने ग्रामस्थांनी खलाटीत धाव घेतली. याचदरम्यान, सर्व शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर साऱ्यांचीच धावाधाव सुरू झाली. स्थानिक तरूणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मानवी साखळी तयार केली. तरूणांनी प्रसंगावधान राखत सर्व शेतकऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. यामध्ये महिलांचाही समावेश होता. सर्व शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









