प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव नऊ विरुद्ध तीन मतांनी संमत झाला आहे. यामुळे दापोली पंचायत समिती मधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आल्याने खळबळ माजली आहे.
दापोली पंचायत समितीचे सभापती हजवानी यांच्याविरोधात दापोली पंचायत समितीतील सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. याची आज शुक्रवारी ११ वाजता झूम ॲपद्वारे ऑनलाईन सभा पार पडली. यामध्ये ठरावाच्या बाजूने नऊ सदस्यांनी व ठरावाच्या विरोधात तीन सदस्यांनी मतदान केले. या संपूर्ण प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी काम पाहिले.