दापोली / प्रतिनिधी
शंभर वर्ष जुन्या असणार्या कुणबी समाजोन्नती संघ आला कुणबी भवनाच्या जागेपासून वंचित ठेवून महिन्याभरापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या एका कुणबी संघटनेला कुणबी भवनासाठी जागा देण्याचा विषय आज दापोली नगरपंचायत मध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्यासमोर कुणबी समाजाचे नेते रमेश पांगत यांनी उपस्थित केला. यावर जिल्हाधिकारी दोन्ही संस्थांचे अर्ज आपणाकडे पाठवून देण्याचे आदेश नगर पंचायत पशासनाला दिले आहेत.
दापोली शहरातील आजाद मैदान येथे कुणबी समाज कुणबी समाज भावनाकरिता जागेचे आरक्षण आहे. ही जागा शंभर वर्ष जुन्या असणाऱया कुणबी समाजोन्नती संघाला मिळावी याकरिता संघाने दापोली नगरपंचायत जागा मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र हा विषय पेंडिंग असताना महिन्याभरापूर्वी स्थापन झालेल्या कुणबी संघटनेला जागा देण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या दापोली नगरपंचायतीच्या सभेत घेण्यात आला. यावरून या सभेत मोठे रणकंदन देखील झाले होते.
आता जिल्हाधिकारी या जागेबाबत कोणता निर्णय घेतात व कोणत्या संस्थेला ही जागा समाज भावना करिता उपलब्ध करून देतात याकडे साऱ्या कुणबी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









