प्रतिनिधी/दापोली
शंभर वर्ष जुन्या कुणबी समाजोन्नती संघ दापोलीला कुणबी भवनाच्या जागेपासून वंचित ठेवून महिन्याभरापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या नव्या कुणबी भवना करिता जागा देण्याच्या विषय नगराध्यक्षांनी आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेतला. यावरून दापोली नगरपंचायतीची 25 जानेवारी रोजी झालेली विशेष सर्वसाधारण सभा आरोप-प्रत्यारोपांनी चांगली गाजली. या सभेत विरोधकांनी नगराध्यक्ष परवीन शेख यांच्यावर त्या ओबीसी समाजात फूट पाडत असल्याचा थेट आरोप केला.
यावेळी विषयपत्रिकेवर पहिलाच विषय कुणबी समाजाला समाज भावना करिता जागा देणे असा होता. सदर विषयाचे वाचन झाल्यावर सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस पक्षाकडून सदर विषयाला अनुमती असल्याचे लेखी पत्र प्रशासनाला देण्यात आले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. विरोधकांनी नगरपंचायत कडे याआधी मागणी पत्र असणाऱ्या शंभर वर्ष जुन्या असणार्या कुणबी संघटनेला जागा देण्याबाबत का ठराव घेण्यात आला नाही? याबाबत विचारणा करण्यात आली.
शिवाय महिन्याभरापूर्वी स्थापन झालेल्या संघटनेचा ठराव कसा काय पटलावर आला? याबाबत विचारणा करण्यात आली. याबाबत नगरसेवक सचिन जाधव यांनी आपण जे पत्र नगरपंचायत प्रशासनाला दिले होते त्याला नगरपंचायत प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचा आरोप केला. भाजपच्या प्रवक्त्या व गटनेत्या जया साळवी यांनी कुणबी समाजामध्ये अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यांना आधी एकत्र येऊ द्या. मग संपूर्ण कुणबी समाजासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मंजूर करा असा विषय मांडला. यावर शिवसेनेचे गटनेते प्रकाश साळवी यांनी चर्चाच नको आम्ही ठराव दिलेला आहे असा विषय मांडल्यावर नगरसेवक रवींद्र क्षीरसागर यांनी चर्चा सभागृहात चर्चा करायची नाही मग मीटिंग कशासाठी घेता? असा प्रश्न विचारला.
यावरून सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले. यात राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी नगराध्यक्षांना त्या स्वतः ओबीसी आरक्षणातून नगराध्यक्ष झालेल्या आहेत. तरीदेखील त्या कुणबी भवनाच्या जागेवरून जुन्या संघटनेला डावलून नव्याने अस्तित्वात आलेल्या संघटनेला जागा देण्याचा घाट घालत असल्याने हा कुणबी समाजामध्ये फूट पाण्याचा प्रकार नगराध्यक्षा करत असल्याचा थेट आरोप सचिन जाधव यांनी भर सभेत केला. मात्र याला नगराध्यक्षा परविन शेख यांनी काहीही उत्तर दिले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









