प्रतिनिधी/दापोली
दापोली तालुक्यातील जालगाव मिसाळवाडी येथील अमोल जाधव यांच्या विहिरीत भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने जीवदान दिले.
अमोल जाधव सकाळी पाण्याची मोटर सुरू करण्याकरिता विहिरीजवळ आले तेव्हा त्यांना बिबट्या विहिरीत पडलेला आढळून आला. त्यांनी तात्काळ यासंबंधी वन विभागाला कळवले. यानंतर विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वन संरक्षण सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे, वनपाल साताप्पा सावंत, अनिल दळवी, वनरक्षक महादेव पाटील, सुरेखा जगदाळे, सुरज जगताप, वनमजूर संजय गोसावी, वन विभागाचे संजय धोंडगे, बालाजी नांदूरके, परमेश्वर डोईफोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांच्या मदतीने चार तासांच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला विहिरी बाहेर सुखरूप काढून जीवदान दिले.
Previous Articleस्थगिती उठवताच तात्काळ वीज तोडणी सुरू
Next Article नागपूरमध्ये 15 ते 21 मार्च संपूर्ण लॉकडाऊन









