प्रतिनिधी / दापोली
कोरोनाची साखळी ब्रेक करण्याकरिता शासनाने जाहीर केलेल्या महिन्याभराच्या लॉकडाऊनची दापोली नगरपंचायतीने कडक अंमलबजावणी करण्यास बुधवारपासून सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी नगर पंचायतीच्या पथकाने तब्बल 40 जणांना दंड आकारला.
बुधवारी शासनाने मात्र कडक भूमिका घेतली.
बुधवारी सकाळपासून दापोली नगरपंचायतीचे पथक दापोली शहरात फिरत होते. ज्यांच्या नाकाला मास्क नाही, त्यांच्या तोंडावर मास्क नाही अशा नागरिकांकडून पाचशे रुपयांच्या पावत्या फाडण्यात येत होत्या. त्याचप्रमाणे जिथे गर्दी झालेली आहे अशा दुकानदारांना कडक भाषेत समज देण्यात येत होती.
याचा अनेक दुकानदारांनी चांगलाच धसका घेतला. मात्र या पथकाची अनेक ठिकाणी वाद-विवाद त्याच्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. सकाळच्या सत्रात या पथकाने 40 जणांना दंड आकारला. या पथकात दीपक सावंत, अमित रेमजे, अरुण मोहिते, योगिता गायकवाड, सुवर्णा पवार, शैलेश दुर्गवळे, सिद्धेश खामकर अनघा सणस, पोलीस कर्मचारी रमेश जडयाळ यांचा समावेश होता.









