वार्ताहर / मौजे दापोली
दापोलीत कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि शासनाच्या नियमांचे पालन होण्यासाठी दापोली नगरपंचायतीच्या वतीने मास्क न वापरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. त्यामुळे पुन्हा दापोलीत 7 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दापोली शहरात नुकतीच पुन्हा 7 नागरीकांवर मास्क न वापरल्यामुळे 500 रूपयांची पावती फाडण्यात आली. एका दिवसात दापोली नगरपंचायतीकडून 3500 रूपयांची दंडाची वसूली करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई सुरू आहे, हे नागरीकांना माहिती असून देखील नागरीक मास्क वापरत नसल्याचे दानपंकडून सांगण्यात आले.
Previous Articleसोलापूर शहरात ६० नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू
Next Article कर्नाटक हायकोर्टाकडून मुख्यमंत्र्यांना दिलासा









