वार्ताहर / मौजे दापोली
दापोली पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे सभापती रउफ हजवानी यांनी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली 30 सप्टेंबर रोजी दापोली पंचायत समितीची आढावा बैठक बोलावली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हजवानी यांनी नुकतीच मुंबई येथे जाऊन सेनेचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली होती शिवाय जवानी यांच्या पत्नी यांनी शिवसेनेत अधिकृतरीत्या प्रवेश केला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हजवानी यांनी शिवसेनेत प्रवेश करणे टाळले होते. आता त्यांनी पंचायत समितीची आढावा बैठक आमदार शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली आहे. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जवानी हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याने आता या सभेत राष्ट्रवादी कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेत वादंग होऊ नये शिवसेनेने कंबर कसली असून कंबर कसली आहे.
पंचायत समिती सभापती रुऊफ हजवानी आणि आमदार योगेश कदम प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या आढावा बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे दापोली प.सं. सभापती रुउफ हजवानी यांनी शिवसेनेशी जवळीक साधायला सुरुवात केल्यानंतर ही पहिलीच आढावा बैठक असल्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.









