वार्ताहर / मौजेदापोली
दापोलीत शुक्रवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल असून त्यात पावसाचा देखील गडगडाटासह शिडकाव होत आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार प्रचंड चिंतेत आहेत.
दापोलीचे कमाल 31.8 तर किमान 20 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे. या अशा वातावरणामुळे आंबा, काजू झाडांवर तुडतुड अशा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. अशा प्रकारचे कोणते रोग होऊ नये याकरीता डाŸ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडे व कृषी विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाला आहे. यामुळे बागायतींवर व शेतींवर परिणाम होण्याची दाट शक्यता विद्यापीठाकडून वर्तविण्यात आली आहे. दापोलीत ढगाळ वातावरण असून तिथकाच धुके देखील आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये पावसाने आगमन केले. तर शहरामध्ये पावसाचा शिडकाव सुरू आहे. अशा प्रकारचे वातावरण पोषक नसल्यामुळे आजार देखील बळावण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.









