प्रतिनिधी/दापोली
राज्य परिवहन महामंडळाची बस व दोन दुचाकी यांच्या झालेल्या विचित्र अपघातात मुलगा व आई जागीच ठार झाल्याची घटना दापोली तालुक्यातील वळणे येथे घडली. मीनाक्षी बोर्जे (वय-45) व आकाश बोर्जे- (21) अशी अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. यामुळे वळणे गावावर शोककळा पसरली आहे
दापोली तालुक्यातील वळणे एमआयडीसी पुलालगत सदर अपघात झाला. दाभोळ गावाहून दापोलीकडे राज्य परिवहन महामंडळाची बस अडीच वाजण्याच्या सुमारास वळणे एमआयडीसीच्या पुला जवळ आली. यावेळी दापोलीकडून वळणे गावाकडे जाणारे मीनाक्षी बोर्जे व आकाश यांच्या दुचाकी गाडीला या दाभोळ दापोली बसने जोरदार धडक दिली. ही धडक दिल्यानंतर त्यांच्या मागून येणाऱ्या देवके येथील विलास गोरीवले वय 60 व निलेश गोरीवले- वय 35 यांची दुचाकी या अपघातग्रस्त गाड्यांवर येऊन आदळली. यावेळी एसटी चालकाने दोन्ही गाड्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला व गाडी लगतच्या शेतात उतरवली. मात्र तोपर्यंत बोर्जे आई व लेकाच्या दुचाकीची धडक बसला बसून दोघेही जागीच ठार झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









