हर्णे / वार्ताहर
शुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध असलेला दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्र किनारा सध्या रसायनांच्या टाक्या आणि डांबराच्या थरामुळे काळवंडला आहे. या विद्रुपीकरणामुळे समुद्रावर सफर करणाऱ्याना मात्र त्रास होत आहे.
यावर्षी अनेक ठिकाणी पुरामध्ये मोठे नुकसान झाले. या पुरात वाहून जाणारे साहित्य समुद्रातुन पुन्हा किनाऱ्यावरच येते. यामध्ये केमिकल डांबर व तत्सम पदार्थ असतात. सध्या अशाच केमिकल आणि डाम्बरा चा थर आंजर्ले समुद्र किनारी पाहायला मिळत आहे. यामुळे निसर्ग सौंदर्य हरवत आहे. आंजर्ले समुद्रकिनारा पर्यटकांचे मोस्ट फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. त्यातच आता गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकर चाकरमानी समुद्र किनारी फिरायला येत असतात. तसेच आंजर्ले मुर्डी परिसरातील गणेश विसर्जन याच किनाऱ्यावर होते. त्यामुळे सध्या या किनाऱ्यावर वर्दळ आहे. मात्र किनाऱ्यावर पसरलेल्या डांबरामुळे किनाऱ्यावरील सैर अडचणींची झाली आहे.









