रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जेएसडब्लू पोर्टचे व्यवस्थापक कॅप्टन श्रीराम रवी चंदेर (४८) यांचे सोमवारी कोरोनामुळे उपचार सुरू असताना मुंबई येथे दुःखद निधन झाले.
कॅप्टन श्रीराम रवी चंदेर हे 2017 पासून येथील जेएसडब्लू पोर्टचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते, त्यांनी याठिकाणी उत्तम काम करतानाच चांगला जनसंपर्क निर्माण केला होता, अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात सुद्धा ते नेहमी पुढे असायचे, काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांनतर अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते मात्र सोमवारी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली. त्यांच्या या निधनानंतर सर्वत्र एक चांगला माणूस गमावल्याचे भावना व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









