नागरिकांनी खबरदारी घ्यावी पोलिसांचे आवाहन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या जिल्हयात एकही कोरोना रुग्ण नाही म्हणून लोक बेफिकीर पणे वावरताना दिसून येत असून रत्नागिरी शहरासह जिह्यात नागरिकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे त्यामुळे जिल्हा पोलीस दलाकडून खबरदारी च्या सूचना करण्यात आल्या आहेत.
अद्यापही लॉकडाऊन संपले नाही आणि जिह्यात आता एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही म्हणून नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत, रत्नागिरी जिह्यात लॉकडाऊन आहे की नाही असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत, जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात ठोस भूमिका घेणे गरजेचे असून जिह्यात अद्यापही धोका टळलेला नाही असे असतानाही नागरिक रत्नागिरीत लॉकडाऊन नसल्यासारखे फिरताना दिसत आहे, गाडय़ांची वर्दळ ही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
येथील मारुती मंदिर, साळवी स्टॉप, बाजारपेठ भागात आणि इतर काही ठिकाणी नागरिक अनावश्यकपणे वावरताना आढळून येत आहेत, पोलीस दलाकडून कारवाई केली जात असली तर अद्याप यावर कोणाचेही नियंत्रण नाही.
सिधुदुर्ग जिल्हाही कोरोनामुक्त झाला होता मात्र मुंबईतून आलेल्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे त्यामुळे आता तरी नागरिकांनी सावध व्हावे आणि प्रशासनाने ही चाकरमान्यांना कोकणात आणताना खूप गांभीर्याने विचार करावा अन्यथा मुंबई सारखी परीस्थिती रत्नागिरीत निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.









