प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 16.39 इतका वाढला आह़े सर्वसाधारणपणे 10 टक्क्यांच्या खाली पॉ†िझटिव्हीटी रेट असणे सुरक्षित मानले जात़े त्यामुळे वाढती रूग्णसंख्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे करत आहेत़ दरत्यान रविवारी 576 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ तर 13 जणांचा मृत्यू झाल़ा
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 350 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 226 अशा एकूण 576 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आल़ी यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 160, दापोली 27, खेड 30, गुहागर 49, चिपळूण 62, संगमेश्वर 60, मंडणगड 00, लांजा 41 व राजापूर 47 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 26 हजार 961 इतकी झाली आह़े तर जिह्यामध्ये नव्याने 13 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 5, चिपळूण 1, खेड 1, गुहागर 1, लांजा येथील 2, दापोली 1, मंडणगड 1 व संगमेश्वर येथील 1 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल़ा जिह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार, रत्नागिरी 206, खेड 91, गुहागर 33, दापोली 75, चिपळूण 164, संगमेश्वर 117, लांजा 49, राजापूर 61, मंडणगड 8 अशी नोंद आहे. जिह्यातील एकूण मृतांची संख्या 804 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.98 इतका आह़े









