प्रतिनिधी / रत्नागिरी
वर्षानुवर्ष घेतली जाणारी तीच ती पिके, शेतीत वाढलेला रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, पीक उत्पादनासाठीची जीवघेणी स्पर्धा यामुळे जमिनीचा पोत बिघडू लागला आह़े याबाबत शेतकऱयांनी वेळीच जागृत होऊन शेत जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याची गरज लक्षात घेत शेतकऱयांना जिल्हा कृषी कार्यालयाकडून जिह्यात 4 हजार जमीन आरोग्य पत्रकांचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या माध्यमातून 2015 पासून मृद आरोग्यपत्रिका हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्यात येत आह़े या अंतर्गत जिह्यातील माती नमुने तपासून 4 हजार आरोग्य पत्रकांचे वाटप करण्यात आले आह़े चालू वर्षी कोरोनामुळे राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यातील गावांची निवड केली होत़ी या प्रकल्पांतर्गत जिह्यात 4 हजार जमीनींची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेसाठी जमिनीतील विविध घटकांची तपासणी करण्यात येत़ हे घटक, त्यांचे पमाण पाहून कोणती खते द्यायची हे ठरवणे शेतकऱयांना सोपे जाणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









