संगमेश्वर बेलारी येथील 82 वर्षीय वृध्दाचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबईतून 2 जून रोजी संगमेश्वर बेलारी येथे दाखल झालेल्या 82 वर्षीय वृध्दाला श्वास घेण्यास त्रास होवू लागल्याने संगमेश्वर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी 3 जूनला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. संबंधित वृध्दाला श्वास अधिक त्रास होवू लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवारी सकाळी उपचारादरम्यान वृध्दाचे निधन झाले त्याच्यावर त्वरीत येथील चर्मालय स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या या दोन आठवडय़ात जिल्हय़ात वाढली असून मृत्यू झालेले सर्व रूग्ण हे 55 वर्षावरील आहेत. कोरोनाला आता रोखायचे असल्याचे आवाहन जरी मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी जिल्हय़ात अद्यापही मुंबईतील चाकरमानी मोठय़ा संख्येने दाखल होत असून यामध्ये आरोग्य यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडत आहे.
संगमेश्वर बेलारी येथील वृध्दाला मुंबईतून आल्याच दिवशी श्वास घेण्यास त्रास सुरू झाला होता. 3 ते जून या कालावधीत उपचार सुरू होते अखेर बुधवारी सकाळी 82 वर्षीय या वृध्दाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.









