जिल्हय़ाची पॉझिटीव्ह संख्या आता 183
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मंगळवारी रात्री आलेल्या अहवालानुसार जिल्हय़ात आणखीन 8 पॉझिटीव्ह रूग्णांची वाढ झाली असून जिल्हय़ाचा कोरोना पॉझिटीव्हचा आकडा चढता क्रमांकांनेच वाढत आहे. एकूण पॉझिटीव्हची संख्या आता 183 इतकी झाली असून या वाढत्या संख्येत मुंबई प्रवास असलेल्याच रूग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
रत्नागिरी जिल्हय़ात मुंबई- पुण्यातून आलेल्या चाकरमानी मोठय़ा प्रमाणात होम कोरोंटाईन करण्यात आले आहे. तर यातील काही चाकरमानी संस्थात्मक कोरोंटाईन असून 80 टक्के चाकरमान्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून चाकरमानी आल्यानंतर त्वरीत कोरोंटाईन केले जाते. त्यामुळे जिल्हय़ाला कोरोना प्रसार होण्यास आळा बसला आहे.
मंगळवारी रात्री जिल्हय़ातील पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांपैकी पुनस कुंभारवाडी 1, राजापूर 1, नाणीज घडशीवाडी 2, दख्खन संगमेश्वर 1, रत्नागिरी शांतीनगर 1, मानसकोंड फेपडेवाडी संगमेश्वर 2 असे 8 रूग्णांचा समावेश असून आता एकूण रूग्ण 183 झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील शिकाऊ 7 नर्सेसना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली होती मात्र आपण मंगळवारी नाही डिस्चार्ज दिले बुधवारी डिस्चार्ज दिल्याचे सांगितले त्यामुळे रूग्णांच्या डिस्चार्जबाबत सिव्हील सर्जनकडे अधिकृत माहिती नसते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.









