रत्नागिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात 51 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 19 रुग्ण आरटीपीसीआर तर 32 रुग्ण अँटिजेन टेस्ट केलेले आहेत. नव्या 51 रुग्णांपैकी खेड तालुक्यात 1, गुहागर 11, चिपळूण 7, संगमेश्वर 1, रत्नागिरी 18, लांजा 6 आणि राजापूर तालुक्यात 7 नवे रुग्ण सापडले आहेत.
तर 24 तासात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात खेड मधील 2, संगमेश्वर 1, रत्नागिरी 1 आणि चिपळूण तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
Previous Articleआसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल
Next Article तुंगतच्या सर्व्हेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी









