रत्नागिरी / प्रतिनिधी:
जिल्ह्यात मागील 24 तासात तब्बल 64 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ऐन शिमगोत्सवात रुग्ण वाढल्याने चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
24 मार्च रोजी जिल्ह्यात 28 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. मात्र गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चिंताजनक असून गुरुवारी जिल्ह्यात 64 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 10,555 वर जाऊन पोहचली आहे. आज आलेल्या अहवालात 57 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 7 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज रत्नागिरी शहरातील एका शाळेतील शिक्षक पॉझिटिव्ह आल्याने ती शाळा देखील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जिल्ह्यात वाढत जाणारी रुग्णसंख्या ही चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने आता जबाबदारीने वागत कोरोना संबंधी शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.