प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजन चाचणीत 60 तर आरटीपीसीआर चाचणीत 41 असे एकूण 101 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2681 इतकी झाली. तर जिल्ह्यातील तिघांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा 6, संगमेश्वर 1, तसेच 1 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1781 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 4
कळबणी – 13
गुहागर – 19
दापोली – 4
मंडणगड -१
ॲन्टीजेन टेस्ट मधील*
रत्नागिरी – 27
कामथे – 20
राजापूर – 4
घरडा रुग्णालय – 9
एकूण 41 + 60 = 101 पॉझिटिव्ह रुग्ण
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील 75 वर्षीय रुग्ण, किर्तीनगर, रत्नागिरी येथील 58 वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा,रत्नागिरी येथील 58 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 94 झाली आहे.
Previous Articleऑनलाईन नाटक हे भविष्य आहे : अजित परब
Next Article पुणे विभागातील 1,07,153 रुग्ण कोरोनामुक्त : सौरभ राव









