प्रतिनिधी / रत्नागिरी
गेले महिनाभर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना गेल्या २४ तासात अचानक २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८६८९ वर पोहोचला आहे. २४ तासात ६ रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८२०६ झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे, अशी माहिती आज मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशिल पुढीलप्रमाणे :
आरटीपीसीआर
रत्नागिरी २
चिपळूण ५
संगमेश्वर ४
एकूण ११
अँटीजेन
रत्नागिरी ३
दापोली १
गुहागर २
चिपळूण १
संगमेश्वर १
मंडणगड २
लांजा २
एकूण १२