प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पंधरा दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे आणि हे अधिक चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत १०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हावासीयांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. रत्नागिरीतील महिला रुग्णालय कोविड रुग्णालय करण्याची वेळ आली आहे. कोरोना रुग्णांची रत्नागिरी जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या पाहता सर्वांनीच आता सावधगिरी बाळगायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांचा आकडाही ६०वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,८८१वर पोहोचली आहे.
मृतांची आकडेवारी
रत्नागिरी – १४
चिपळूण – १२
दापोली – १२
खेड – ६
संगमेश्वर – ७
राजापूर – ४
गुहागर – २
लांजा – २
मंडणगड – १
आजची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – १८८१
बरे झालेले – १२५२
मृत्यू – ६०
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – ५१४
Previous Articleमनपातील महसुल विभागात गोंधळाचे सावट
Next Article सांगली जिल्हय़ात दिवसभरात 12 मृत्यू, 156 नवे रूग्ण









