प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 57 तर आरटीपीसीआर चाचणीत 43 असे एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2945 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कळबणी 2, समाजकल्याण रत्नागिरी 24, घरडा, लवेल, खेड 2 येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1847 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 43
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 36
संगमेश्वर – 7
गुहागर – 2
देवरुख – 2
घरडा रुग्णालय – 10
एकूण 57 + 43 = 100 पॉझिटिव्ह रुग्ण
आज नाचणे, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच दापोली येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच कर्टेल, खेड येथील ऍ़न्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 68 वर्षीय कोरोना रुग्णाचा 16 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू संख्या आता 105 झाली आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2945
बरे झालेले – 1847
मृत्यू – 105
उपचारात – 993









