प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी 71 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर उपचाराच्या दरम्यान आज तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 132 झाली आहे. दरम्यान, 94 रुग्णांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली आहे. नव्या पॉझिटिव्ह रूगणामध्ये आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरीत 7, लांजात 5 तर कळंबणीत 8जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
तर ॲन्टीजेन टेस्टमध्ये रत्नागिरीत 37 व खाजगी हॉस्पीटलमध्ये 14 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 787 झाली आहे. संगममेश्वर तालुक्यात पांगरी येथील 65 वर्षीय, खेड तालुका वेरळ येथील 75 वर्षीय व चिपळूणमधील 52 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह
एकूण पॉझिटिव्ह – 3787
बरे झालेले – 2472
मृत्यू – 132
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 1183
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









